Dhule : साक्रीत लहानांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये राडा, १७ जखमी

crime

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री शहरातील सुभाष चौकात दोन लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये तुफान राडा झाला. मिरचीपुडसह लोखंडी रॉड, काठ्या, चाकुचा यात सर्रासपणे वापर करण्यात आल्याने १७ जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील ३० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

साक्री शहरात यश मार्गे व निखिल जाधव या दोघा लहान मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मात्र या भांडणात मोठ्यांनी सहभाग घेतला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सुभाष चौकात दोन गट समोरा-समोर आले. मिरची पुड एकमेंकावर फेकुन हातातील लोखंडी रॉड, लाकडी काठया, तिक्ष्ण चाकुने एकमेकांवर हल्ले करण्यात आले. यात गणेश अरुण जगताप, भटु रविंद्र मार्गे, रविंद्र नथ्थु मार्गे, अशोक नथ्थु मार्गे, यश नथ्थु मार्गे, गोल्डन नथ्थु मार्गे, रंजना गणेश जगताप, सुनिता रविंद्र मार्गे, सिमा अशोक मार्गे, संजीवनी गोल्डन मार्गे, ममता नथ्थु मार्गे, ताराबाई नथ्थु मार्गे, सुनिता मनोज शिंदे, महेश दीपक शिंदे, मनोज उत्तम शिंदे, विरेंद्र मनोज शिंदे, राहुल दीपक शिंदे हे जखमी झाले आहेत.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला.

याबाबत दिलीप कांबळे यांच्या फिर्यादीवरुन रविंद्र नथ्थु मार्गे, अशोक नथ्थु मार्गे, भटु रविंद्र मार्गे, यश रविंद्र मार्गे, गोल्डन नथ्थु मार्गे, गणेश अरुण जगताप, रंजना गणेश जगताप, सुनिता नथ्थु मार्गे, सिमा अशोक मार्गे, संजवणी गोल्डन मार्गे, ममता नथ्थु मार्गे, ताराबाई नथ्थु मार्गे सर्व (रा. भाजीपाला मार्केट, मेन बाजारपेठ, साक्री), तर दुसऱ्या गटाचे राहुल दीपक शिंदे, विरेंद्र मनोज शिंदे, दीपक उत्तम शिंदे, मनोज उत्तम शिंदे, संगीता दीपक शिंदे, सोनी मनोज शिंदे, भरत गौतम जगताप, राणी मनोज शिंदे, निकीता मनोज शिंदे, मुकेश रविंद्र पवार, मिलींद रविंद्र पवार, कलीबाई उत्तम शिंदे, महेश दीपक शिंदे, निखील राजेंद्र जाधव, गौरव ऊर्फ झिंगु बाबुराव जगताप, रुपेश रविंद्र पवार, मिनाबाई रविंद्र पवार, दिनेश ओंकार जाधव सर्व(रा.लोकमान्य नगर, साक्री) यांच्याविरोधात कलमान्वये साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करित आहेत.

हेही वाचा : 

 

The post Dhule : साक्रीत लहानांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये राडा, १७ जखमी appeared first on पुढारी.