सिन्नर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील लोणारवाडी शिवारात बागाईत परिसरात बिबट्याने भर दिवसा शेतकयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
रविवारी (दि. ९) दुपारी ३.३० च्या सुमारास रामनाथ खंडू लोणारे (३८) हे शेतात काम करण्यास गेले असता, मकाच्या पिकात दबा धरून बसलेल्या विबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या रामनाथ लोणारे यांनी आरडाओरड केली. त्यानंतर नंदू लोणारे, माणिक लोणारे, भगवान लोणारे, गणेश मिते, बाळू मिठे आदीसह नागरिकांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर बिबट्याने रामनाथ यांना सोडून भारवाडी शिवारात पालायन केले. लोणारे यांच्या हाताला जखम झाली असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
हेही वाचा: