MUHS : 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्ण

आरोग्य विज्ञान विद्यापीठ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा (Convocation ceremony) शुक्रवारी (दि.२३) आयोजित करण्यात आला आहे. या समारंभामध्ये 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवीने गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध विद्याशाखेतील 111 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

विद्यापीठ परिसरातील प्रबोधिनीमध्ये सकाळी ११ ला दीक्षान्त सोहळा होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व बेळगावचे केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे कुलगुरू डॉ. नितीन गंगने हे उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना डीलिट् ही विद्यापीठाची विशेष समान्य पदवी प्रदान करण्यात येईल. विविध विद्या शाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12,486 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांत गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदक, एकास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल बैस हे ऑनलाइन पध्दतीने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमचे ‘ई-प्रबोधिनी’ व बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्लू-प्रिंट यांचे प्रकाशन करतील. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन करणार आहेत. दीक्षान्त समारंभाचे https://youtube.com/live/aUjwAqGcwMo?feature=share यूटयूब चॅनलवर (YouTube channel) थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

विद्याशाखेनिहाय पदवीप्राप्त विद्यार्थी संख्या
आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551, दंत विद्याशाखा पदवीचे 2195, आयुर्वेद शाखेचे 871, युनानी शाखेचे 99, होमिओपॅथी शाखेचे 1217, बेसिक बीएस्सी नर्सिंग 2464, पीबीबीएस्सी नर्सिंग शाखेचे 366, बीपीटीएच शाखेचे 254, पॅरामेडिकलचे 637, पदवी ऑप्टोमेट्री 52, ऑक्युपेशनल थेरपीपदवी अभ्यासक्रमाचे 17, बीपीओ शाखेचे 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच पदव्युत्तर विद्या शाखेमध्ये मेडिकल 2864, दंत 497, आयुर्वेद 63, होमिओपॅथी 18, एमएएसएलपी 2, डिप्लोमा मेडिकल शाखेचे 2, एमपीओ 2, नर्सिंगचे 92, ऑक्युपेशनल थेरपीचे 29, फिजिओथेरपी 15, डिएमएलटीचे 87, डिप्लोमा पॅरामेडिकल शाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल.

हेही वाचा:

The post MUHS : 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्ण appeared first on पुढारी.