Murder : महिलेला एकटी पाहून घरात घूसला, हेतू साध्य न झाल्याने केला निर्घूण खून

नाशिक

जळगाव : घरात एकटे असल्याची संधी साधून एका तरुणाने महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं प्रतिकार करताच लोखंडी वस्तूने डोक्यात वार करुन महिलेची हत्या (Murder) केल्याची घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घडली. संशयित आरोपीचे विशाल ज्ञानेश्वर साबळे (वय २३) असे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात महिलेला एकटी पाहून वाईट हेतूने तो घरात घुसला. मात्र हेतू साध्य न झाल्याने त्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी अवजाराने वार करून निर्घूण खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पोलीस पथकाने अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Team India: टीम इंडियात 6 खेळाडूंचे स्थान पक्के, पण उर्वरित 5 जणांवरून पेच!

Murder : पोलिसांची घटनास्थळी धाव…

मयत महिलेचा चुलत सासरा बकऱ्या चारून घरी परतला. दरवाज्याला कडी पाहून सुनबाई कुठे बाहेर गेली असावी म्हणून सासऱ्याने दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्यांना सुनबाई किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. घटनेची माहिती मिळताच जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक लॅब पथक, एलसीबी पथक, फिंगरप्रिंट्स पथक, श्वान पथक अशा विविध क्राईम डिपार्टमेंटच्या तपास यंत्रणेला पाचारण करण्यात आले.

Murder : आरोपीस केली अटक…

मयत महिलेचा पती सुरेश पाटील हा जामनेर येथे चहाची हॉटेल लावून व्यवसाय करतो. त्यामुळे तो सकाळीच घरून व्यवसायासाठी गेला होता. मयत महिलेचा मुलगा शाळेत तर सासूही बाहेरगावी गेलेली होती. या संधीचा फायदा घेऊन गावातील गुन्हेगारी वृत्तीचा तरुण विशाल नाना साबळे (वय २३) याने वाईट हेतूने हे कृत्य केले आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने गुप्त यंत्रणेच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास लावला. फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा : 

The post Murder : महिलेला एकटी पाहून घरात घूसला, हेतू साध्य न झाल्याने केला निर्घूण खून appeared first on पुढारी.