
नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
येथे दहावा मैल परिसरातील टायरच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानातून रोकडसह दोन लाख ५२ हजार 400 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्यूब आणि टायर चोरून नेले.
शेषधर दुबे यांचे दहाव्या मैलावर सर्व्हिस रोडवर न्यू भारत टायर ॲण्ड ट्यूब्स हे दुकान गुरुवारी (दि. 2) मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानातील काउंटरमधून २५ हजार रुपयांच्या रोकडसह जे- के कंपनीचे दुचाकी, चारचाकी आणि ट्रक यांचे टायर ट्यूब असे एकूण २४ नग, एमआरएफचे दुचाकीचे टायर ट्यूबसह ८ नग, सिएट कंपनीचे दुचाकी ट्यूबसह टायर १६ नग, क्लासिक कंपनीचे ट्रकच्या टायरच्या आतील तीन ट्यूब व सिएटच्या चार ट्यूब असा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी दुबेंनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Sidharth-Kiara : ३ दिवसांत खर्च केले इतके कोटी, ‘या’ कपलनी लग्नात पाण्यासारखा ओतला पैसा
- आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका
- मुंबई : होळी सणासाठी कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस सोडणार…!
The post Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास appeared first on पुढारी.