
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
ठाणगाव शिवारातील लावदरी मळा येथे बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
या भागात रात्री शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी (दि.12) सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली.
रमेश पानसरे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. वनविभागाकडून जेरबंद बिबट्याला पिंजऱ्यासह मोहदरी माळेगाव वनोद्यान येथे हलविण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Cyclone Mocha | मोचा बनले अतिशय तीव्र चक्रीवादळ, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
- खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतींचा ‘कचरा’; डेपोतील कचर्याने आजाराला निमंत्रण
- काेकण वार्तापत्र : जलवाहतुकीचा नवा आरंभ
The post Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.