Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) येथे सुरु असलेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. एमपीए होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे हे चार वाजता हजर राहणार आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यात सांघिक व वैयक्तीत क्रीडा प्रकारांचे सामने होत आहे. रविवारपासून (दि. ४) सुरु झालेल्या या स्पर्धांचे शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ८) सायंकाळी उद्घाटन होणार आहे. यावेळी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, संचलन होणार आहे. याप्रसंगी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यादेखील उपस्थित राहणार आहेत. या क्रीडा स्पर्धांमध्ये १३ संघ, साडे तीन हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. तसेच १९० हून अधिक क्रीडा प्रकार घेण्यात येत आहे.

हेही वाचा:

 

The post Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.