Nashik : अबब… बाजरीच्या शेतात आढळला दहा फुटी अजगर

दहा फुटी अजगर,www.pudhari.news

नगरसुल : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तुम्ही अ‍ॅनाकोंडा हा चित्रपट पाहिला असेल, त्यातील भलामोठा अजगर आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली ही पाहिल्या असतील. असाच काहीसा प्रत्यक्ष अनुभव घेतला तो येवला तालुक्यातील ममदापुर या गावाच्या शेतात बाजरी सोंगणी करीत असलेल्या शेतक-यांनी.

बाजरीच्या शेतात प्रकाश तिवारी, सुरेश वैद्य, विजय तिवारी यांना सोंगणी करीत असताना अचानक एक मोठ्ठा अजगर निदर्शनास आला आणि एकच थरकापच उडाला. हा भला मोठ्ठा अजगर पाहाण्यासाठी याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. तिवारी बंधू यांनी घटनेची माहिती ममदापुरचे पोलीस पाटील बाळासाहेब वैद्य, पत्रकार दिपक उगले यांना दिली. पत्रकार दिपक उगले यांनी शेतात  येऊन खात्री करून भ्रमणध्वनीद्वारे वनरक्षक ममदापूर गोपाळ हरगावकर यांना माहिती दिली.

येवला तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजापूर गोपाळ राठोड, वनरक्षक येवला पंकज नागपुरे यांनी तिवारी यांच्या शेतातील अजगरला पकडून ममदापुरच्या जंगलात सोडून दिले. दरम्यान अजगराची कैद आणि शेतक-यांचा सुटकेचा श्वास हा प्रवास चित्तथरारक असाच होता.

हेही वाचा :

The post Nashik : अबब... बाजरीच्या शेतात आढळला दहा फुटी अजगर appeared first on पुढारी.