Nashik : दोन घटना.. दोन भामटे..अन् दोघांना गंडा!

फ्राॅड www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा भामट्यांनी दोघांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा व इंदिरानगर पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राहुल नितीन टेकाळे (३१, रा. मंगलनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांना २५ ते २७ मार्च दरम्यान भामट्याने गंडा घातला. राहुल यांना भामट्याने फोनवरून संपर्क साधून तो आयसीआयसीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे भामट्याने ९७ हजार रुपये काढून राहुल यांची फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत योगिता संजय बर्वे (रा. हिरावाडी) यांना संशयित ज्ञानेश्वर पाटील (रा. निफाड) याने गंडा घातल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

योगिता यांच्या फिर्यादीनुसार संशयित ज्ञानेश्वर पाटील याने १४ नोव्हेंबर २०२२ ते १२ जून २०२३ या कालावधीत मुलास नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून ३० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी न देता किंवा पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे योगिता यांनी संशयिताविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा : 

 

The post Nashik : दोन घटना.. दोन भामटे..अन् दोघांना गंडा! appeared first on पुढारी.