Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून गेलेल्या परप्रांतीय संशयितास भद्रकाली पोलिसांनी बिहार राज्यातून ताब्यात घेतले. असगर अली इसराफील अन्सारी (१९, रा. गोपालगंज, बिहार) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, तेथे पीडिता तिच्या कुटुंबीयांसह राहते. दरम्यान, फेब्रुवारीपासून संशयित असगर अलीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर तो गावी निघून गेला व लग्नास नकार दिला. वारंवार संपर्क करूनही संशयिताने लग्नास नकार दिला. दरम्यान, पीडितेने भद्रकाली पोलिसांकडे पोक्सोसह बलात्काराची फिर्याद दाखल केली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, अंमलदार किरण जाधव, विशाल गायकवाड यांचे पथक बिहारला तपासासाठी गेले होते. त्यावेळी असगर अली हा त्याच्या मूळ गावी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेत नाशिकला आणले. या प्रकरणी न्यायालयाने असगर अलीला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik : बलात्कार करणारा परप्रांतीय गजाआड appeared first on पुढारी.