Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक

विंचूर नाशिक,www.pudhari.news

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या माजी वसुंधरा अभियानात राज्यात नाशिक जिल्ह्यातील विंचूर ग्रामपंचायतीला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. यात एक कोटी 25 लाख रुपयांचे बक्षीस गावाला मिळाले असून दहा हजार लोकसंख्येच्या गटात विंचूर गावाने ही कामगिरी केली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गावाला हे पारितोषिक वितरित करण्यात आले आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमास विंचूरचे सरपंच रत्नाकर दरेकर, उपसरपंच प्रविण चव्हाण, निफाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खंडेराव सोनवणे, विंचूर ग्रामविकास अधिकारी जी.टी.खैरणार, संगणक चालक मनोज चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत विंचूर ग्रामपंचातीने पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. गावाच्या याच कामाची दखल या बक्षिसाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भुमी, वायु, जल अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधीत पंचतत्तावर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली.

रस्त्त्याच्या कडेला देशी व विदेशी झाडे

यात भुमीतत्वावर आधारीत कार्यक्रमात रस्त्त्याच्या कडेला देशी व विदेशी झाडे लावण्यात आली आहे. गावाने रस्ता दुतर्फा, काँलनी अंतर्गत तसेच 150 वर्षापूर्वीची असलेली हेरिटेज झाडांडी निगा राखून त्यांची गणना करुन प्रमाणपत्र प्राप्त केले. गावात रोपांची नर्सरी व गार्डन तयार करण्यात आले आहे. प्लॅस्टिक बंदी बाबत गावात जनजागृती करण्यात आली असून गावात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. तसेच नाशिक येथील एजन्सीमार्फत दवाखाऩ्यातील कच-याचे गावाच्या बाहेर निर्मूलन करण्यात आले आहे. गावात घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात आली आहे. ओला व सुखा कचरा वेगळा करणे, विंचूर गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करणे आदी विविध प्रकारची कामे करण्यात आली आहे.

फटाके बंदीसाठी जनजागृती

वायु तत्वावर आधारीत कामात वायु तपासणी (प्रदुषण तपासणी) करण्यात आल्या, फटाके बंदीसाठी जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन पिकांचे अवशेष न जाळण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. तसेच उज्वला गॅस कनेक्शन लाभार्थीची निवड करुन त्यांना गँस जोडणी देणे कामी मदत करण्यात आली. प्रदुषण मुक्तीसाठी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. त्याच प्रमाणे इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकी गाड्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

रेन वाँटर हार्वेस्टींग

जल अभियाना अंतर्गत जल शिवार योजनेतून बंधाऱ्याचे खोलीकरण केले.,खाजगी व सरकारी इमारतीवरील पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वाँटर हार्वेस्टींग करण्यात आले.,पाझर खड्डे तयार करण्यात आले. जुन्या विहीरींचे खोलीकरण करणे,गावात शेतकऱ्यांमार्फत ठिंबक सिंचन करणेसाठी जनजागगृती करुन त्यांना प्रवृत्त केले. तसेच गणेश उत्सव काळात पर्यावरण पुरक गणपती मुर्ती बसविण्यासाठी जनजागृती करुन त्यासाठी बक्षिसांचे आयोजन करण्यात आले.

खाजगी व सरकारी इमारतीवर सोलर

वसुंधरा अभियान अंतर्गत, शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली. 5 पर्यावरण दुत तयार करुन त्यांच्या मार्फत रॅली काढुन जनजागृती करण्यात आली. अग्नी तत्वावर आधारित कामासाठी, खाजगी व सरकारी इमारतीवर सोलर बसविण्यात आले. विज वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. रस्त्यावर सोलर लाईट बसविण्यात आलेले आहेत. बायोगॅस निर्मिती करण्यात आली. सौर पथदिवे, बसविण्यात आले.

गावात रोपांची नर्सरी

गावात रोपांची नर्सरी तयार करण्यात आली. प्लॅस्टिक बंदी बाबत जनजागृती करुन प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. ओला व सुखा कचरा वेगळा करणे, विंचूर गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात आले. प्रदुषण तपासणी करण्यात आली. फटाके बंदी साठी जनजागृती करण्यात आली.,शेकऱ्यांच्या बैठका घेऊन पिकांचे अवशेष न जाळण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. तसेच उज्वला गॅस कनेक्शनसाठी लाभार्थीची निवड करुन त्यांना गँस जोडणी देण्यासाठी मदत करण्यात आली. प्रदुषण मुक्तीसाठी जनजागृतीचा भाग म्हणून सायकल रॅली काढण्यात आली, इलेक्ट्रीक्ल दुचाकी चारचाकी वाहन वापरा संदर्भात जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा :

The post Nashik : माझी वसुंधरा अभियानात विंचूर ग्रामपंचायतीला राज्यात तिसरे पारितोषिक appeared first on पुढारी.