Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार

गारपिट,www.pudhari.news

विंचुरी दळवी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील बोरखिंड शिवडा येथे सायंकाळी 6.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, मका, द्राक्षे यांचे नुकसान झाले. सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा आणि गारपिटीला सुरुवात झाली.

नांदूरशिंगोटे परिसरात बोगदेवाडी येथे ठाकर वस्तीवर डोंगराच्या कडेला मनोहर हरी आगविले यांच्या अकरा व बहू पाटील प्रभाकर मेंगाळ यांच्या पाच शेळ्या झाडाखाली बांधलेल्या होत्या. वीज पडल्यामुळे त्या मृत्युमुखी पडल्या. तर पाच अत्यवस्थ झाल्या आहेत. या प्रकरणी नांदूरशिंगोटे येथील तलाठी अरुण मोरे यांनी धाव घेत पंचनामा केला. यावेळी येथील अरुण शेळके, कैलास बर्गे, भाऊपाटील दराडे, माजी सरपंच पांडुरंग आगविले, भाऊपाटील आगविले आदींनी या ठिकाणी धाव घेत या कुटुंबाला धीर दिला. सुदैवाने कुटुंबातील कुणाला दुखापत झालेली नाही. या कुटुंबाला त्वरित मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार appeared first on पुढारी.