Nashik Crime : पंचवटीत दोन गटांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला

मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना पेठरोडवरील मच्छीबाजाराजवळ घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. यातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मच्छीबाजाराजवळ शनिवारी (दि.११) सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही गटातील युवक परिसरात जमले. पोलिसांत दाखल असलेला गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून दोन्ही गटातील युवकांमध्ये बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. टोळक्याने रॉड, दांडक्यांचा सर्रास वापर करीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली व सार्वजनिक शांतता बिघडली. या हाणामारीत तान्हा देवराम शिंदे, देवराम लासु शिंदे, शिवा देवराम शिंदे, संदीप अशोक लाड (सर्व रा. भराडवाडी, फुलेनगर) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पोलिसांनी संशयित सुरज रमेश बोडके, विनोद रमेश बोडके व धीरज रमेश बोडके यांना ताब्यात घेतले. पंचवटी पाेलिस ठाण्यात जखमी व ताब्यात घेतलेल्यांसह रमेश पांडुरंग बोडके, सचीन दीपक शिंदे, प्रेम शिंदे, दीपक शिंदे यांच्यासह इतर चार ते पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : पंचवटीत दोन गटांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.