नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इसिसच्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे पुरविण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या नाशिकमधील संशयित तरुणास रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने २३ जानेवारी रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातून संशयित हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत एसटीएस कोठडी सुनावली होती. या दरम्यान संशयिताने दुबईतून हवालामार्फत आर्थिक मदत केल्याचे पथकाने पुरावे गोळा केले. तसेच देशातून आणखी एका संशयिताने पैसे पुरवल्याचे समोर आले. हुजेफ यास बुधवारी (दि.३१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सखोल तपासासाठी पुन्हा सोमवार (दि.५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान पथकाने हवालामार्फत किती, कसे व कोणाला पैसे पुरवले यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच संशयित हुजेफ याने सीरिया येथील राबिया ऊर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर किती पैसे पाठविले, त्यांच्यात काेणता संवाद झाला, या प्रकरणात इतर संशयित आहेत का? याचाही तपास दहशतवादविरोधी पथक करीत आहेत.
हेही वाचा:
- Nashik Crime News : इसिसला नाशिकमधून ‘टेरर फडींग’, उच्चशिक्षीत अभियंत्याला अटक
- ‘लश्कर ए तोयबा, अल बद्र’साठी ‘टेरर फंडिंग’चे काम करणा-या मोहम्मद यासीनला दिल्लीतून अटक
- Yasin Malik Terror Funding Case : टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा
The post Nashik Crime News : टेरर फंडिंगमधील संशयित आज पुन्हा न्यायालयात appeared first on पुढारी.