नाशिक: अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ

Advay Hire

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : रेणूकादेवी सुतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर त्यांना सोमवारी (दि.20) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. बी. बहाळकर यांनी डॉ. हिरे यांच्या पोलीस कोठडीत गुरुवार (दि.23) पर्यंत वाढ केली. Advay Hire

डॉ. हिरे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 2012 साली मालेगाव येथील रेणूकादेवी सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले तीन कोटी 40 लाखांचे कर्ज थकविले होते. या प्रकरणात हिरे यांच्याकडे बँकेचे एकूण 35 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज थकले होते. सदर कर्ज थकविल्याप्रकरणी डॉ. हिरे यांच्यासह इतरांवर मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयात डॉ. हिरे यांना भोपाळ येथून अटक करण्यात आली होती. त्यांना गुरूवारी (दि.16) मालेगाव न्यायालयात आणण्यात आले असता न्यायाधीश एस. व्ही. बघेले यांनी डॉ. हिरे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. Advay Hire

सोमवारी (दि.20) रोजी डॉ. हिरे यांची पाच दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्या. बहाळकर यांच्या न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद करताना सरकारी वकिल व जिल्हा बँकेचे वकिल ए. वाय. वासिफ यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, जिल्हा बँकेला दोन दिवस सुट्टी असल्याने बँकेकडून काही रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकले नाही. ते रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी तसेच बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांचे जाबजबाब घेणे महत्वाचे असल्याने त्यांनी चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्या. बहाळकर यांनी दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकत या प्रकरणाचा तपास सुरु असल्यामुळे त्यांनी डॉ. हिरे यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. यावेळी डॉ. हिरे समर्थकांनी न्यायालय आवारात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

The post नाशिक: अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ appeared first on पुढारी.