Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे ‘इतके’ अर्ज बाद; आज अंतिम माघारी

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक (Nashik Gram Panchayat Election) कार्यक्रमाअंतर्गत साेमवारी (दि. ५) अर्ज छाननीत सदस्य पदाचे ५६ तर थेट सरपंच पदासाठीचे १० अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.७) पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे.

सार्वत्रिक निवडणूकाअंतर्गत जिल्ह्यातील १४ तालूक्यातील १९६ ग्रामपंचायतींमध्ये (Nashik Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील ३८४ प्रभागांमधील सदस्य पदांसाठी इच्छुकांचे एकूण ५ हजार २१२ अर्ज दाखल केले. तर थेट सरपंचपदाकरीता 979 इच्छूकांचे अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले. दाखल सर्व अर्जाची सोमवारी (दि. ६) छाननी प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये सरपंचाचे केवळ १० अर्ज बाद ठरले. त्यामुळे रिंगरात ९६९ इच्छूकांचा अर्ज आहेत. तसेच सदस्यांमधून ५ हजार २१२ पैकी 5156 नामनिर्देशन अर्ज वैध ठरले आहेत. तांत्रिक कारणास्तव प्रशासनाने ५८ अर्ज अवैध ठरवले.

निवडणूकीत अर्ज वैध ठरलेल्या इच्छूकांना माघारीसाठी बुधवारी (दि. ७) दुपारी साडेतीनपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर लगेचच रिंगणातील अंतिम ऊमेदवारांची यादी प्रसिद्धी व निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छूकांसह स्थानिक स्तरावर पॅनल निर्मिती करून उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. अंतिमत: माघारी कोण घेणार यावरच निवडणूकीचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यामुळे माघारीकडे साऱ्यांच्यांचे लक्ष लागून आहे.

 हेही वाचा :

The post Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे 'इतके' अर्ज बाद; आज अंतिम माघारी appeared first on पुढारी.