Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग

मनमाड आग pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनमाड येथील नगर चौकी मार्गावर असलेल्या सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. येथील सामजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्ते आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असून कंपनीच्या बॉलरमध्ये आग लागल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

The post Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग appeared first on पुढारी.