Nashik I शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरुप सुटका

जानोरी बिबटया pudhari.news

नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा

जानोरी तालुक्यातील शिवनई येथील केंद्रीय संरक्षण विभाग प्रकल्पाच्या भिंतीलगत तारकंपाउंड मध्ये शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरुपपणे सुटका केली आहे.

सोमवारी (दे.22) सकाळी सात वाजेच्या सुमारास शिवनई गावालगत असणाऱ्या खंडेराव मंदिराजवळील केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाच्या भिंतीला असणाऱ्या कंपाउंडमध्ये एक बिबट्या श्वानाची शिकार घेऊन जात असताना अडकला. स्थानिक परिसरातील शेतकरी वर्गाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि याबाबत वनविभागाला माहिती दिली. दिंडोरीचे वनविभागाचे वनपाल अशोक काळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात रेस्क्यू टीमच्या मदतीने बिबट्याना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याची सुखरूप सुटका केली आहे. सदर बिबट्या हा तीन वर्षे वयाची मादी असल्याचे वनविभागाने यावेळी सांगितले. बिबट्याला अधिक उपचारासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील निवारा केंद्रात हलवण्यात आल्याची माहिती वन अधिकारी अधिकारी अशोक काळे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post Nashik I शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरुप सुटका appeared first on पुढारी.