नाशिक पुढारी वृत्तसेवा- एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, वायुसेना अध्यक्ष भारतीय वायुसेना यांनी स्टेशन ओझरचा दौरा केला. यावेळी वायुसेना ओझर स्टेशनच्या अधिकारी तसेच सैनिकांशी त्यांनी संवाद साधला.
एयर चीफ मार्शल वी आर चौधरी, यांनी मंगळवार (दि. २३) वायुसेना परिवार कल्याण संगठन अध्यक्षा नीता चौधरी यांच्यासह वायुसेना स्टेशन ओझरचा दौरा केला. वायुसेना स्टेशन ओझर मार्फत त्यांचे स्वागत एयर मार्शल विभास पाण्डेय, वायु अफसर कमांडिंग इन चीफ, अनुरक्षण कमान, तसेच वायुसेना परिवार कल्याण संगठन (क्षेत्रीय) अध्यक्षा श्रीमती रूचिरा पाण्डेय व एयर कमोडोर आशुतोष वैदय, वायु अफसर कमांडिंग, वायु सेना स्टेशन ओझर यांनी केले.
वायुसेना अध्यक्षानी 08 मार्च 2024 रोजी डिपोला मिळालेल्या प्रेसिडेंट कलर्स सम्माना करिता डिपो कर्मचा-यांचे अभिनंदन केले. वर्ष 2023 करिता अनुरक्षण कमानचे अतंर्गत “सर्वोत्कृष्ट बेस रिपेअर डिपो” सम्मान करिता ही त्यांनी शुभेच्छा दिल्या. वायुसेना अध्यक्षानी डिपोचा इतिहास व माइल्ड स्टोन दर्शविना-या अशा छायाचित्र प्रदर्शनीचे निरीक्षण करीत सेवारत वायुयोध्दांशी तसेच पूर्व-वायुसैनिकांशी परस्पर संवाद साधला.
नीता चौधरी वायुसेना परिवार कल्याण संगठन अध्यक्षा यांनी वायुसेना स्टेशन ओझरचे परिवारा करीता डिपो द्वारा राबविल्या जाणा-या विभिन्न कल्याणकारी योजनांची पाहणी केली. हया भेटी दरम्यान त्यांनी डिपोतील वायुसंगीनी बरोबर परस्पर संवाद साधला.
हेही वाचा –