
चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील निमोण येथील नितीन एकनाथ सोनवणे (३५) हा तरुण शेतकरी शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला असता त्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती निमोणचे पोलिसपाटील हिरामण मारुती देवरे यांनी चांदवड पोलिसांना दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
नितीन सोनवणे हे गुरुवारी (दि.१९) दुपारी ३ च्या सुमारास लाइट जाईल म्हणून जनावरांना पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी लोखंडी पेटीत वीज उतरल्याने नितीनने पेटीला हात लावताच त्यास विजेचा जोराचा धक्का बसला. त्यामुळे तो शेतात खाली पडला. हा प्रकार त्यांचे बंधू सचिन यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच नितीनला मनमाड येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून नितीन मृत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस नाईक चित्ते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
हेही वाचा :
- India Canada Diplomatic Row | जस्टिन ट्रुडो पुन्हा बरळले; “भारताने लाखो लोकांचे जीवन कठीण केलं”
- Jalgaon Crime : भुसावळ, अमळनेरातील गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध
- Dhule : साक्री बाजार समितीच्या भरारी पथकाचा दणका ; विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्यांवर कारवाई
The post Nashik News : विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.