Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

टवाळखोरांना चोप,www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा; अंबड औद्योगिक वसाहतीसह अंबड गाव, दत्तनगर, कारगिल चौक आदी भागांत भररस्त्यात विनाकारण ठाण मांडून बसणाऱ्या टवाळखोरांना एमआयडीसी पोलिसांकडून चांगलाच चोप देण्यात आला. यासह अवैध गुटखाविक्री सुरू असल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून टपरीधारकांची तपासणी सुरू आहे. दोन दिवसांपासून एमआयडीसी पोलिसांनी अनेक टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता पुन्हा एकदा पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. यामुळे अंबडवासीयांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. (Nashik News)

अंबड एमआयडीसी पोलिस चौकीच्या हद्दीत अंबड औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी हजारो कामगार दिवसभरातून ये-जा करतात. यात महिला कामगारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महिलांची छेडछाड, कामगारांची लूटमार असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. कंपनी भरणे व सुटण्याच्या वेळी पाळत ठेवून अशा टवाळखोर गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. यासह दत्तनगर, कारगिल चौक, संजीवनगर, चुंचाळे शिवार, अंबड गाव, म्हाडा कॉलनी या ठिकाणी शाळा तसेच मुख्य चौकांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच चोप दिला आहे. एकीकडे अवैध गुटखाविक्रीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांकडून टपरीधारक-चालकांकडूनही प्रवाशांची लूट व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत, रिक्षाचालकांनाही पोलिसांकडून समज दिली आहे. अनेक भाजीविक्रेते व पथविक्रेते यांच्यामध्ये वादविवाद होत असल्याने सायंकाळच्या वेळी पेट्रोलिंग करून या व्यावसायिकांना तंबी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी चौकीच्या अधिकारी व अंमलदारांनी केली आहे. गुन्हेगार टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे. (Nashik News)

हेही वाचा :

The post Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप appeared first on पुढारी.