Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी, मला सुरक्षेची गरज नाही

Sanjay Raut www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या थुंकण्याच्या कृतीबरोबरच काही दिवसांच्या वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. मात्र, राऊत यांनी ‘वन मॅन आर्मी’ असल्याचे सांगत मला सुरक्षेची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या थुंकण्याच्या कृतीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. त्यातच राऊत त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर जाणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याचा विचार करून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत शिघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) पथक दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचीही त्यांना सुरक्षा कायम होती. दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेत वाढ केल्यावरून राऊत म्हणाले की, ‘माझ्या इतके चांगले संतुलन कुणाचेच नाही. माझ्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली, त्यांना सुरक्षा द्या. मी वन मॅन आर्मी असून मला सुरक्षेची गरज नाही, त्यामुळे मला दिलेली सुरक्षा परत पाठवा.

दरम्यान, राऊतांच्या विरोधात जिल्ह्यात जागोजागी जोडो मारो आंदोलन केले गेले. त्याचबरोबर राऊत त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर असल्याने, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :

The post Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी, मला सुरक्षेची गरज नाही appeared first on पुढारी.