Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

पोलीस बदली www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलिस दलातील ४४९ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालयास नव्याने १५ पोलिस निरीक्षक मिळाले असून, सात निरीक्षकांची नाशिकबाहेर बदली करण्यात आली असून, दोघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलिस दलातून दोघांची बदली, तर नव्याने नऊ पोलिस निरीक्षक दाखल होणार आहेत.

या बदल्यांमध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, तर अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांची सांगली येथे बदली झाली आहे. या बदल्यांसह नाशिक आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी निरीक्षकांच्या बदल्यांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे पोलिस ठाण्यांसह गुन्हे पथकांना नवे निरीक्षक मिळण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, उपनगर, सरकारवाडा, सायबर, भद्रकाली, गुन्हे युनिट-२, विशेष शाखा या ठिकाणच्या तत्कालीन निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती मिळाल्याने ते पद रिक्त आहे. तर बदल्यांमुळे मध्यवर्ती गुन्हे, अंबड, आर्थिक गुन्हे हे रिक्त झाले आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या निरीक्षकांची कोठे नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इच्छित बदल्यांसाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचेही समजते.

नाशिक शहरला आलेले पोलिस निरीक्षक 

सुभाष भोये (अहमदनगर), शंकर काळे (पुणे शहर), सुभाष ढवळे (ठाणे शहर), सोहन माछरे (नांदेड), दिवाण वसावे (नाशिक ग्रामीण), प्रमोद वाघ (नाशिक ग्रामीण), संतोष नरुटे (मुंबई), विद्यासागर श्रीमनवार (हिंगोली) गजेंद्र पाटील (ठाणे), सुशीला कोल्हे (मुंबई), अशोक नजन (जात प्रमाणपत्र तपासणी समिती), दिनेश शेंडे (पोलिस अकादमी, नाशिक), नितीन पगार (राज्य गुप्तवार्ता), जितेंद्र सपकाळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ), तुषार अढावू (पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला), विजय पगारे व भरतसिंग पराडके यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच दुर्गेश शेलार (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा) व माधवी चौधरी (राज्य गुप्तवार्ता) यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे तर सुनील बच्छाव (महामार्ग सुरक्षा पथक) यांची गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात बदली झाली आहे.

नाशिक ग्रामीणला मिळालेले अधिकारी

रवींद्र मगर (नाशिक शहर), विनोद पाटील (दहशतवाद विरोधी पथक), प्रीतम चौधरी (विशेष सुरक्षा), सत्यजित शशिकांत आमले (वर्धा), प्रशांत अहिरे (विशेष सुरक्षा), दत्ता चौधरी (मुंबई), सोपान काकड (मुंबई), प्रमोद पवार (पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे), रघुनाथ शेगर (पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे) यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे.

नाशिकहून बदलून गेलेले अधिकारी

शहरातील डॉ. अंचल मुदगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सतीश घोटेकर यांची धुळे, सूरज बिजली यांची सांगली, चंद्रकांत अहिरे यांची मुंबई शहर, वामन बंडेवाड यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर, नीलेश गायकवाड यांची नंदुरबार, संजयकुमार गावित यांची जात प्रमाणपत्र तपासणी समिती येथे बदली झाली आहे. तर ग्रामीणमधील एकनाथ पाडळे यांची बुलडाणा, रामेश्वर गाडे यांची छत्रपती संभाजीनगर, माणिक पत्की यांची राज्य गुप्तवार्ता येथे बदली झाली आहे.

हेही वाचा:

The post Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक appeared first on पुढारी.