नाशिक : पाठलाग करुन पोलिसांनी चोरट्यांना पकडले

पाठलाग करीत पकडले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आडगाव पोलिसांनी संशयित चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आहे. सखोल चौकशीत या चोरट्यांनी दोन वाहन चोरी व एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यांमधील किंमती मुद्देमाल जप्त केला आहे.

श्रावण पोपट भालेराव (२३, रा. नांदुरनाका) व सोनु उर्फ अनिल माणिक शिंदे (२१, रा. जेलरोड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. आडगाव गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. एस. वाढवणे, अंमलदार दिनेश गुंबाडे, निखील वाघचौरे, अमोल देशमुख हे शुक्रवारी(दि.३१) रात्री गस्त मारीत होते.

त्यावेळी एका दुचाकीवरून दोघे संशयित भरदाव जाताना पथकास दिसले. त्यांच्या दुचाकीस नंबरप्लेटही नव्हती. तसेच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते फरार झाले. त्यामुळे पोलिसांनी दोघांचाही पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उपनगर व कसारा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून वाहन चोरी व दिंडोरीतील जानोरी गाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान पठाण, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कामगिरी केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : पाठलाग करुन पोलिसांनी चोरट्यांना पकडले appeared first on पुढारी.