अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-येथील आयएमआर महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाने गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केला. अशी तक्रार ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता पोलीसांत दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी शहरात आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षणासाठी वास्तव्याला आहे. अल्पवयीन पिडीत विद्यार्थींनी व अल्पवयीन विद्यार्थी यांनी जेईई परिक्षेची तयारी साठी खाजगी क्लास लावलेला होता. जुलै २०२२ पासून ते मार्च २०२३ पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पिडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शाररिक संबंध केले. दरम्यान, हा प्रकार पिडीत विद्यार्थींनीला सहन न झाल्याने तिने थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख या करीत आहेत.

हेही वाचा :

The post अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.