आलिशान कारच्या धडकेत घोडीचा अंत, दोन तरुण जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लग्नात उपस्थित राहिल्यानंतर घराकडे जाणाऱ्या घोडीचा शहरातील त्र्यंबक नाका सिग्नलवर भरधाव कारच्या धडकेत अंत झाला. या भीषण अपघातात सोबतचे दोघे तरुण जखमी झाले तर धडक दिलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी झालेल्या या घटनेने प्रत्यक्षदर्शींनी हळहळ व्यक्त केली.

दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. एकच्या सुमारास पुन्हा आपल्या घरी परतत असताना त्र्यंबक नाका सिग्नलवर घोडी आणि सोबतचे दुचाकीस्वार थांबले होते. सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना सिग्नल तोडून आलेली मर्सिडीज (एमएच १५, डीएस ७५६४) घोडीला जोरदार धडकली. क्षणातच घोडी उंचावर उधळली गेली आणि जोरदार आवाज करत रक्ताच्या थारोळ्यात पडली. या धडकेत त्या घोडीचा करून अंत झाला आहे. सरकारवाडा पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा –