पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाक्याजवळ कादवा नदीच्या काठावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे हिंस्त्र प्राण्याने लचके तोडलेले असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.
उदर व चेहरा नसलेला मृतेदह निदर्शनास आल्यानंतर पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपाताची शक्यता वनअधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. हिंस्त्र प्राण्यानेच मांस भक्षण केल्याचा अंदाज नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळ व परिसरात पायांच्या ठशांचा मागोवा काढण्यात आला. दरम्यान, मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर आहे. कादवा नदीकाठावर अरुण मोरे यांची शेती असून, या भागात लावलेल्या सीसीटीव्हीत अनेक वेळा बिबट्या दिसून आला आहे.
हेही वाचा –
- नीलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट; घड्याळ सोडून ‘तुतारी’ फुंकणार असल्याची चर्चा
- Ajit Pawar On Sharad Pawar: शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी: अजित पवार म्हणाले, त्यांच्या संमतीनेच
- Dhule Crime : चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
The post कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता appeared first on पुढारी.