चांदवड : पुढारी वृत्तसेवा– खासगी बसची वाट पाहात असताना चक्कर येऊन महामार्गावर पडल्याने मूळचा राजस्थान येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजस्थानमधील भिल्लवाडा जिल्ह्यातील हिरडा (खेजडी) येथील कालुनाथ कालबेलिया (३०), मुकेश कालबेलिया (३३) हे लासलगाव येथे विहीर खोदकाम करण्यासाठी आले होते. ते होळी सणाकरिता खेजडी येथे गावी जाण्यासाठी सोमवारी (दि.१८) दुपारी चांदवड पंचायत समितीसमोर मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी बसची वाट पाहात उभे होते. त्यावेळी मुकेश कालबेलिया हा उन्हामुळे चक्कर येऊन महामार्गावर पडला होता. त्याला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत कालुनाथ मधुनाथ कालबेलिया (३०, मूळ रा. खेजडी हुरडा, जि. भिल्लवाडा, राजस्थान) याने चांदवड पोलिसांत खबर दिल्यावर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
हेही वाचा :
- बीआरएसपी लढविणार गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा
- JNU Teaser: उर्वशी रौतेला, रवी किशन स्टारर ‘जेएनयू’चा धमाकेदार टीझर
The post काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.