
जळगाव – जिल्ह्यात (दि. 9) व (दि. 11) रोजी झालेल्या अवकाळीने 3984 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अवकाळी पाऊस व वाऱ्याने 157 गावातील 7372 शेतकऱ्यांचे 3984 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तसेच आज (दि.) 12 5 वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.
हवामान खात्याने लावलेल्या अंदाजानुसार आज तिसऱ्या दिवशी दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. जळगाव येथे 15 ते 20 मिनिटं जोरदार पाऊस चालला. तर भुसावळ येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली.
दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचे तापमान सध्याला 40 ते 42 अंशावर गेलेले आहे. अशातच पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यात 157 गावातील 7372 शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या व व्यापारी वर्गाचे नुकसान झालेले आहे.
यामध्ये दि. 9 रोजी झालेल्या अवकाळी पावसाने जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर या भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांची नुकसान झाले. यामध्ये जामनेर 53, बोदवड 32, मुक्ताईनगर 38 अशा 123 गावांमधील सहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे
The post जळगावला अवकाळीचा तडाखा, शेती पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.