जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

जे. पी. गावित, भास्कर भगरे

सुरगाणा प्रतिनिधी– दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकरी नेते तथा माजी आमदार जे.पी.गावीत यांची शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्याशी अद्यापपर्यंत उमेदवारीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे माजी आमदार गावीत यांच्या निर्णयाची कार्यकर्ते आणि मतदार वाट पाहत आहेत. गेल्या चार दिवसांपासून व्हॉट्सअप व इतर समाज माध्यमांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना गावितांकडून दीड लाख मतांचे गिफ्ट मिळाल्याने, गुढीपाडवा मुहूर्त लाभदायी ठरला अशा बातम्या झळकत आहेत. मात्र सबंध लोकसभा मतदार संघात आणि खास करून सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबक तालुक्यातील माजी आमदार गावितांच्या कार्यकर्त्यांनी मात्र ही बातमी  फेटाळून लावली आहे. Dindori Lok Sabha

जे. पी गावित यांची येथील शेतकरी व कार्यकर्त्यांशी चर्चा होत नाही. ते स्वतः सर्वांशी चर्चा करुन निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते आमच्या मतदारांपर्यंत पोहचणार नाहीत. गावितांनी स्वत: आपली भूमिका जाहीर केली नसल्याने चुकीच्या बातम्या पसरवून मतदार बांधवांना गोंधळात टाकण्याचे काम करू नये असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. Dindori Lok Sabha

याबाबत जे. पी. गावीत यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, सबंध मतदार संघातील कार्यकर्त्यांशी मतदानाबाबत सविस्तर चर्चा झाली नाही, शेतकरी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन, त्यांचे म्हणणे ऐकूण त्यांच्या विचाराअंती पुढील भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. Dindori Lok Sabha

येत्या दोनतीन दिवसांत सबंध मतदार संघातील कार्यकर्ते, शेतकरी, बागायती शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी सविस्तर चर्चा होईल. मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात सर्व लढाऊ कार्यकर्त्यांमार्फत मतदारांचा कौल तपासून पाहिला जाईल, त्यानंतर सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते स्वतः मतदारांपर्यंत जाऊन निर्णय सांगतील. ती आमची मतदानाची खरी दिशा असणार आहे, त्यामुळे मतदारांनी प्रसार माध्यमांवर येणाऱ्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या बातम्या अथवा पोस्ट यावर विश्र्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रसार माध्यमांनीही अशा चुकीच्या बातम्या टाकून मतदार संघातील मतदारांना संभ्रमात टाकू नये, असे आवाहन शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक धुम यांनी केले आहे.

हेही वाचा –

The post जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात appeared first on पुढारी.