तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत

नांदगाव,www.pudhari.news

नांदगाव(जि. नाशिक):प्रतिनिधी– नांदगाव पोलिसांनी मोटर सायकल चोरी विरोधात मोठी कारवाई करत तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेल्या सोळा मोटरसायकली हस्तगत केल्याची माहिती, नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी बुधवार (दि. ३१) पत्रकार परिषदेत दिली.

नांदगाव येथून मोटरसायकली चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. सागर कायस्थ या गृहस्थाची देखील मोटरसायकल चोरी गेल्याने त्यांनी आपली मोटरसायकल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्थानकात दाखल केली होती.

नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, मोटर सायकल चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नांदगाव पोलिसांचे एक पथक तयार केले होते. या पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित इसम अंकुश दादासाहेब गायकवाड राहणार ( नांदूर तालुका नांदगाव ) यास ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी मोटरसायकल चोरीची कबुली देत आपल्या बरोबर अजून दोन साथीदार असल्याचे सांगितले. यामधील पवन शंकर अहिरे रा, ( निंबायती ता. मालेगाव ) तसेच, हर्षल मनोहर गवारे वय वर्ष १९ ( नाशिक ) या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.

सोळा मोटरसायकली हस्तगत

नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत चार, येवला शहर पोलीस हद्दीत दोन, येवला तालुका, मनमाड, लासलगाव, मालेगाव छावणी पोलीस हद्दीत प्रत्येकी एक तर नाशिक शहरातून सहा मोटरसायकली चोरी केल्याचे कबूली दिली. या मध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून सोळा मोटरसायकली हस्तगत केल्या.

यांनी लावला छडा

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक, अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभाग अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर, पो. हा विनायक जगताप, धर्मराज अलगट, भरत कांदळकर, शेख, अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, दत्तू सोनवणे, दीपक मुंढे, सागर बोरसे, पो हा. परदेशी, साईनाथ आहेर यांनी गुन्ह्याचा छडा लावला.

हेही वाचा :

The post तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत appeared first on पुढारी.