Dindori Lok Sabha Election Result 2024 Update Live : उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी (दि.४) रोजी जाहीर होत आहे. येत्या काही तासातच कुणाची सत्ता येणार? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. परंतु भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेल्या उमेदवाराला तब्बल 80 हजार मते मिळत आहेत. यामुळे भास्कर भगरे यांच्या मतैक्याला धक्का लागत आहे.
दरम्यान भगरे सर (बाबू भगरे) यांच्या स्वागतासाठी कांद्याचे हार आणण्यात आलेले आहेत.
तरीही निकालाआधीच भास्कर भगरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतोय तर एक लाख मताधिक्याने आपला विजय होणार असा महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनीही स्वतःच्या विजयाबाबत विश्वास दाखवला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना तुतारी वाजविणारा माणूस हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षचिन्ह आहे. तर अपक्ष उमेदवार बाबू भगरे उमेदवारास तुतारी हे चिन्ह आहे. नावात साधर्म्य आणि तुतारी चिन्ह यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या मतपेटीत फरक पडला आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या नावाशी काहिसे साधर्म्य साधणारे भारत पवार नावाचे उमेदवारही रिंगणात लढा देत आहे.
हेही वाचा: