नाशिकच्या भाविकांवर पालघरमध्ये काळाचा घाला; तिघांचा मृत्यू

Accident

दिंडोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड रोडवर जव्हार मधील वाळवंटा येथे आयशर व जिपच्या झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघर मधील जव्हार विक्रमगड मार्गावर विरार येथे जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जाताना ही दुर्घटना घडली. यात दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या तिघांचा मृत्यू

अपघातात गंगुबाई दशरथ कोरडे, निवृत्ती गणपत पागे, सुंदराबाई निवृत्ती पागे सर्व राहणार आंबेगण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.

वाळवंडा येथील डॉन बॉस्को स्कूल समोर जीप आणि आयशर टेम्पोमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जिपचा पूर्ण चक्काचूर झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.