येवला : पुढारी वृत्तसेवा- मी कधीच कुणाला घाबरत नाही, मी कुणालाही घाबरून माघार घेतलेली नाही. मी मराठा समाजाच्या नाराजीला घाबरून माघार घेतली नाही. तर माझ्यामागे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अर्ध्याहुन अधिक मराठा मतदार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
भुजबळ म्हणाले, अडीच लाखांवरून जास्त मराठा मतदार तेवढेच ओबीसी मतदार व इतर मागासवर्गीय मुस्लिम मते उच्चभ्रू मते ज्यांना ज्यांना नाशिकचा विकास लागतोय यांच्यासह अनेक जण माझ्यासोबत आहेत, मी सहजच दोन लाखाहून जास्त मतांनी निवडून आलो असतो असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी येवला भेटीत व्यक्त केला.
येथील शिवसृष्टीच्या कामाच्या पाहणीच्या वेळेस ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, मला नाशिक मधून उमेदवारी करायचे ठरल्यावर एक महिना वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालले. ते मला काही पसंत नव्हते, सगळं काही मान सन्मानाने होत असेल तर ठीक आहे. जर माझ्यामुळे वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं ठीक आहे मी बाजूला होतो.
हेही वाचा –
- 400 पार होणार नाही म्हणणाऱ्या पोपटांना खानदेशी जनता मतदानातून उत्तर देईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ४८६ अंकांनी वाढून बंद! Kotak ची दाणादाण, Axis Bankची आघाडी, मार्केटमध्ये काय घडलं?