सिडको : पुढारी वृत्तसेवा
येथील कामटवाडे भागात एका बंद फ्लॅटमध्ये दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी त्या बंद घराची तपासणी केली असता तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि. ११) सकाळी आढळून आला. सागर मधुकर शेवाळे (३२) असे मृताचे नाव असून, सागर याने विषारी औषध घेतले आहे का अथवा त्याचा आजाराने मृत्यू झाला आहे? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडे येथील प्रभू हाइट्स या इमारतीतील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. या घटनेची माहिती इमारतीतील रहिवाशांनी अंबड पोलिसांना दिली. पोलिसांनी सागर याच्या बंद फ्लॅटचा दरवाजा उघडला तर त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, सागर हा गेल्या गुरुवारी (दि. २) काही नागरिकांना दिसून आला होता. त्यानंतर मात्र शनिवारी (दि. ११) सकाळी फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. अंबड पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सागर याचा मृत्यू कशामुळे झाला. याबाबतचा तपास पोलिस करत आहे. मयत सागर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शकाखाली पोलिस हवालदार अतुल बनतोडे करीत आहेत.
हेही वाचा: