नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा मिळाला असून अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांनी अर्ज मागे घेतला आहे. महायुतीसमोरील एक आव्हान यामुळे आता कमी झाले आहे.
अनिल जाधव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपनेही आपला दावा दाखल केला होता. मात्र, वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला गेल्याने शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच नाशिकची महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली.
तसेज अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा –