अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण हटविले

अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण हटविले www.pudhari,.news

सिडको : पुढारी वृत्तसेवाअंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी समोरील आर पी स्वीट्सच्या आजूबाजूला अनधिकृतपणे उभारलेल्या टपऱ्या, हॉटेल्स पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांत वादविवादाचे प्रसंग घडले. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले.

अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता मानल्या जाणाऱ्या गरवारे पॉईंट ते एक्सलो पॉइंट या रस्त्याच्या दुतर्फा अनाधिकृतपणे गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायिकांनी चहाच्या टपऱ्या, पान स्टॉल थाटले आहेत. या ठिकाणी अनेक चायनीज विक्रेते, भेळ विक्रेते व पथविक्रेत्यांचाही समावेश आहे. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या कामगार वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांकडून कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिक्रमण निर्मूलन कारवाईचे पत्र मनपाला दिले होते. याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह 15 अंमलदारांनी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला बंदोबस्त दिला होता.

या कारवाईत तीन ट्रक साहित्य जप्त केले आहे. कामगारांना वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण थाटल्यास यापुढे नियमित अतिक्रमण कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेसह पोलिस प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा :

The post अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.