2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

लाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महात्मा फुले महामंडळातील कनिष्ठ लिपीकास २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. छाया विनायक पवार असे लाचखाेर लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मुलाचे महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी २ लाख १६ हजार रुपयांच्या कर्ज मंजूर झाले आहे. मंजूर कर्जाचा धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली. विभागाने सापळा रचला.

त्यानुसार सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात मंगळवारी (दि. १२) तक्रारदाराकडून तडजोड करून २ हजार रुपयांची लाच घेताना छाया पवार हिस विभागाने रंगेहाथ पकडले. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रणय इंगळे, ज्योती शार्दुल, पोलिस शिपाई अनिल गांगुर्डे व चालक परशूराम नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात appeared first on पुढारी.