नाशिक : दहावी’चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार

अपघात,www.pudhari.news

नाशिक (विंचुरी दळवी): पुढारी वृत्तसेवा

सिन्नर घोटी हायवेवर आगसखिंड शिवारात सकाळी दहाच्या सुमारास एचपी गँस टँकर व अँक्टिवा यांचा भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुले यात जागीच ठार झाल्याची घटना घडली.

शुभम रामनाथ बरकले व दर्शन शांताराम आरोटे (वय 16) हे दोघे मित्र आज (दि. 2) दहावीचा पेपर असल्याने अँक्टिवा घेऊन जनता विद्यालय पांढुर्ली येथे पेपर देण्यासाठी निघाले. गावाच्या काही अंतर पुढे गेल्यावर डी. एड काँलेजसमोर त्यांची गाडी गँस टँकरला धडकली व दोघे मित्र जागेवरच ठार झाले.

चांगल्या मार्कने दहावी पास होण्याचे दोघाही मिञांनी ठरवले होते. परंतु त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : दहावी'चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार appeared first on पुढारी.