नाशिक, दिंडोरीत १४ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील १४ हजार २५९ मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती देत दोन्ही मतदार संघातील एकूण ४१ उमेदवारांना नाकारले आहे.

लोकशाही व्यवस्थेत मतदार सर्वात महत्वाचा घटक असतो. मतदान करणे हा मतदाराचा अधिकार आहे. हा अधिकार वापरून नागरिक आपला प्रतिनिधी निवडून देतात. मात्र, निवडणुकीच्या रिंगणातील एक ही उमेदवार पसंतीस न उतरल्यास मतदानाचा हक्क बजावतानाच नकाराधिकार ही नोंदविण्याचा नोटा (नन आफ द अबाेव्ह) हा पर्यायदेखील उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांना आठ हजार २४६, तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील ३१ उमेदवारांना सहा हजार १३ मतदारांनी नाकारलेले आहे.