नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद

चोरी प्रकरणात अटक,www.pudhari.news

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; केवळ यात्रेत मौजमजा करण्यासाठी चोरी करणाऱ्या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले असून, त्यातील दोघांना अटक केली आहे.

आगसखिंड येथील अमिर स्क्रॅप सेंटर दुकानातून रात्री टेबलच्या ड्राॅवरमध्ये असलेली ७५ हजार रुपयांची रोकड व मोबाइल फोन चोरीस गेला होता. याबाबत सिन्नर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडील विशेष तपास पथक समांतर तपास करत होते. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना ही चोरी लहवित येथील आदित्य सौदे (१९) व त्याच्या साथीदारांनी केली असून, ते सध्या औंध (पुणे) ला निघून गेल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औधला जात, तेथे सौदेला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत अनिकेत उमाप (२१, रा. भगूर) आणि पुण्यातील मित्रासोबत चोरी केल्याची कबुली दिली. हे तिघे २३ ऑक्टोबरला भगूर येथे भरनारे देवीच्या यात्रेत आले होते. तेथून त्यांनी रात्री आगसखिंड शिवारात जाऊन चोरी केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ हजारांची रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी जप्त केली. पोलिसांनी सौदे आणि उमाप या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत तीन अल्पवयीन मुलांचाही चोरीत सहभाग आढळला. त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद appeared first on पुढारी.