नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिकला येत आहेत. यावेळी त्यांचा रोड शो व कार्यक्रमास हजेरी राहणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी याबाबत चर्चा होत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन होत आहे. दरम्यान, विशेष सुरक्षा दलाचे पथकही शहरात दाखल झाले असून, ते बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. या पथकाने शहर पोलिसांसह इतर यंत्रणांशी चर्चा करताना काळाराम मंदिराची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मोदी हे मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी बंदोबस्ताचे नियोजन केल्याचे समजते. ओझर विमानतळापासून रोड शो चा मार्ग, कार्यक्रमस्थळ व इतर ठिकाणांचीही केंद्रीय पथकाकडून पाहणी होत असून, आवश्यकतेनुसार ते बदल सुचवत आहे.
अतिरिक्त फौजफाटा
शहर पोलिसांना राज्यभरातून सुमारे १०० पोलिस अधिकारी, १९०० अंमलदारांचा फौजफाटा मिळाला आहे. तर शहरातील सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तावर तैनात आहेत. त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता विभाग, विशेष सुरक्षा विभाग, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथकही शहरात तैनात असणार आहे.
हेही वाचा :
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, १० जानेवारी २०२४
- Bycott Maldieves : ‘पर्यटक पाठवता का.. पर्यटक..’, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची चीनकडे याचना
The post पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार? appeared first on पुढारी.