चेन स्नॅचिंग करणारे गजाआड

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा- भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणा-या दोघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.७) रोजी शिताफीने अटक केली. संशयित शहरात वास्तव्य करून ते चोरीच्या घटना करीत होते. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ४ जानेवारी या दिवशी चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. त्यात ३५ ग्रॅम सोन्याची लगड चोरी केली होती. या घटनेत चोरट्यांनी तब्बल ३५ ग्रॅम सोने लुटून नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते. लुटीच्या वेळी चोरट्यांनी पल्सरचा वापर केल्याचे आणि चोरटे दोघे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर गुन्हा हा बिडी कामगार नगर मधील आरोपीतांनी केल्याची माहिती समोर आली.

दरम्यान प्राप्त झालेल्या गुपनीय माहितीच्या आधारे भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सत्यवान पवार यांनी आपल्या पथकासह आडगाव येथे सापळा रचून ओंकार उर्फ दीपक वसंत शिंदे (२३, रा. बिडी कामगार नगर, पंचवटी) व रोशन सुधाकर कटारे (२३, अमृतधाम, पंचवटी) या दोघांना अटक केली. तसेच चोरीच्या घटनेत वापरलेली पल्सर पोलिसांना ताब्यात घेतली. संशियतांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत याव्यतिरिक्त त्यांनी भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील तीन महिन्यांपूर्वी तपोवन रोडवर घडलेला चेन स्नॅचिंग गुन्हा केला असल्याचे देखील निष्पन्न झाले. दोन्ही संशियतांकडून ३५ ग्राम वजनाची सोन्याची लगड सहित दुसऱ्या गुन्यातील १० ग्राम वजनाची एक सोन्याची लगड तसेच गुंत्यात वापरलेली पल्सर मोटर सायकल असा एकूण ३१८००० (तीन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सतीश साळुंके, अविनाश जुंद्रे, नारायण गवळी, सागर निकुंभ व धनंजय हासे यांनी हि उल्लेखनीय कामगिरी केली असून गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सत्यवान पवार पुढील तपस करीत आहेत.

The post चेन स्नॅचिंग करणारे गजाआड appeared first on पुढारी.