नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लोकसभा मतदारसंघच्या निवडणुकीत सिडको, अंबड भागात सर्वच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अंबड पोलिसांनी अपक्ष उमेदवार चिन्ह मतदान पावती वाटप प्रकरणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या कार्यकर्ते यांना गणेश चौक भागातून ताब्यात घेतले आहे .
सिडकोत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सोमवार (दि.20) रोजी सकाळी सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच गणेश चौक तसेच मारवाडी हायस्कूल येथे मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदार हे स्वयंस्फूर्तीने मतदान करताना दिसून आले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
सिडकोतील गणेश चौक भागात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते बुथ वर निवडणुक चिन्ह असलेले मतदार पावती वाटप करत होते . या वेळी अंबड पोलिसांनी सात कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले आहे या नंतर माहिती समजताच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी अंबड पोलिस ठाणे येथे धाव घेतली या वेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेतली . कार्यकर्ते यांना नंतर सोडून दिले जाणार आहे असे पोलिसांनी सांगितले या नंतर महाराज पुन्हा मतदार केंद्राच्या भेटिसाठी रवाना झाले.
सिडको अंबड चुंचाळे भागातील सर्वच मतदार केंद्रावर सकाळपासूनच मतदान साठी मतदारांनी गर्दी केली होती . दरम्यान काही मतदार केंद्रावर मतदारांची नावे नसल्याने त्यांचा हिरमुड झाला तर मतदान केंद्रावर मोबाईल परवानगी नसल्याने ऐन वेळी नागरिकांचे हाल झाले.
हेही वाचा: