मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत प्रखरतेने मांडता यावा तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यातील ४८ मतदार संघात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणाात उभे केली जाणार आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असेल? यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून आली. बैठकीत अनेकांनी उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखविल्याने, नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, निरीक्षण समितीकडून नाशिक लोकसभा मतदार संघातून चार, तर दिंडोरीतून दोन उमेदवारांचा अहवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांना पाठविणार असून, तेच यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

नांदूर नाका येथील शेवंता लॉन्स येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाशिकसह दिंडोरीतील मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभीच नाशिक लोकसभा निवडणूक मराठा क्रांंती मोर्चाने लढवावी, असा निर्णय एकमताने मंंजूर करण्यात आला. त्यानंतर इच्छुकांना आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली गेली. त्यामध्ये अनेकांनी सकल मराठा समाजाची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. बैठकीस राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने, उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात तर पडणार नाही ना? अशी शंकाही काही मराठा बांधवांनी उपस्थित केेली. मात्र, समाजासाठी सदैव तत्पर असणारा, समाजासाठी लढणारा, राजकारण विरहीतच उमेदवार दिला जाणार असल्याचे निरीक्षण समितीने स्पष्ट केल्याने, उमेदवारीसाठी आता मराठा समाजातही रस्सीखेच दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, निरीक्षण समितीने नाशिक लोकसभा मतदार संघातून नाना बच्छाव, करण गायकर, सुलोचना भोसले, डॉ. सचिन देवरे या नावांचा अहवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांना पाठविला जाणार आहे. तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारती गोंजाळे व कल्पना गांगुर्डे यापैकी एक उमदेवार मराठा समाज पुरस्कृत असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी (दि.३०) रोजी दोन्ही मतदार संघातील मराठा उमेदवाराच्या नाावाची घोषणा जरांगे-पाटील यांच्याकडून केलली जाणारर आहे. बैठकीसाठी शिवसेना ठाकरेे गटाचे विजय करंजकर, विलास पांगारकर, शिवाजी सहाणे यांच्यासह शांतीगिरी महाराजांचे अनुयायी देखील उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन योगेश नाटकर-पाटील यांनी केले.

उमदेवारीसाठी निकष

– समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला, समाजासाठीच्या आंदोलने, मोर्चे यामध्ये सदैव भाग घेणारा, समाज घटकासाठी प्रत्येक वेळी धावून जाणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यालाच दिली जाणार उमेदवारी.

– उमेदवाराचे नातेगोते, क्रयशक्ती, जनसंपर्क, शिक्षण, सामाजिक कार्य, समाजातील स्वच्छ प्रतिमा याबाबींचा विचार केला जाईल.

– राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या किंवा निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या राजकीय उमेदवारास उमेदवारी दिली जााणार नाही. कारण सकल मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही.

– मनोज जरांगे-पाटील ज्या उमेदवाराचे नाव अंतिम करणार, त्याच्या पाठिशी सर्व इच्छुकांंनी एकजुटीने त्याचा प्रचार करावा. त्यास निवडून आणण्यास सहकार्य करावे, कोणीही वेगळी भूमिका किंवा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असाही शब्दही बैठकी घेण्यात आला.

निरीक्षण समितीत यांचा समावेश

मराठा समाजातून योग्य उमेदवार निवडण्यासाठी निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात सेवानिवृत्त प्राचार्य हरिश आडके, चंद्रकांत बनकर, सुनील निरगुडे, बापूसाहेब चव्हाण, डॉ. वसंत ढिकले, सेवानिवृत्त प्राचार्य बी. जी. वाघ, हिरामण वाघ यांचा समावेश आहे.

भुजबळ विरोधात गर्जना

बैठकीत मराठा बांधवांकडून मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात गर्जना केली. भुजबळ निवडणूूकीच्या रंणागणात उतरल्यास, संपूर्ण समाज एकजुुटीने त्यांचा पराभव करेल असा सूर व्यक्त करण्यात आला. शिवाजी सहाणे यांनी भुजबळांनी आता घरी बसावे अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला.

या नावांवरही चर्चा

महाविकास आघाडीकडून तिकिट कापल्यामुळे नाराज असलेले विजय करंजकर हे मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा रंगली होती. त्याबरोबर दिनकर पाटील, शांतिगिरी महाराज, दशरथ पाटील हे देखील मराठा समाजाचे संभाव्य उमेदवार असू शकतात.

हेही वाचा –

The post मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर appeared first on पुढारी.