नाशिक ; पुढारी ऑनलाइन- काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेनिमित्त ते नाशिकमध्ये येणार आहेत. जिल्हा कॉंग्रेसकडून या यात्रेनिमित्त जोरदार तयार करण्यात येत आहे. अशातच आता राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी कॉलद्वारे आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
ज्याप्रकारे राजीव गांधी यांना बॉम्बने उडवण्यात आले त्याचप्रकारे राहुल गांधी यांनाही बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा कॉल आठ दिवसांपूर्वी नाशिक पोलिस आयुक्तालयात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ याप्रकरणाची चौकशी करुन धमकी देणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान तो माथेफिरु असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेसह प्रशासन सतर्क झाले आहे.
हेही वाचा :
- बीड: राक्षसभुवनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरूद्ध गुन्हा
- Himachal Pradesh political crisis : ‘हिमाचल’मधील सरकार लवकरच कोसळेल : बंडखोर आमदारांचा दावा
The post मोठी बातमी, राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी appeared first on पुढारी.