नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागानेही प्रोटोकॉलनुसार खबरदारी म्हणून तीन ठिकाणी आपत्कालीन रुग्णालयांसह रुग्णवाहिका व रक्तदाते यांची व्यवस्था केली आहे.
शहरात पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री शुक्रवारी (दि.१२) येत आहेत. त्यामुळे त्यांना पुरवलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे खबरदारी म्हणून आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष राखीव ठेवला आहे. एचएएल येथे व पंचवटीतील अपोलो रुग्णालयातही कक्ष तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आठ अत्याधुनिक रुग्णवाहिका ताफ्यात तैनात असून, त्यात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व सहायकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे ‘ए प्लस’ व ‘ए निगेटिव्ह’ रक्तगटाचे दातेही तयार करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
- तेरवाड बंधार्यावर प्रदूषण नियंत्रण अधिकार्याला पाजले दूषित पाणी
- शरद मोहोळच्या खून प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत
- शाळांत विद्यार्थ्यांना अंडी देणे बंधनकारक, शिक्षण विभागाचे पुन्हा आदेश
The post मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.