नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र व राज्यातील इतर प्रमुख मंत्र्यांचीदेखील उपस्थिती असणार आहे.
दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनच्या वतीने मुंबई नाका येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे २७ व २८ जानेवारी रोजी दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स् परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. तसेच सहकार मंत्रालयाच्या न्यू ड्राफ्ट पॉलिसीचे चेअरमन सुरेश प्रभू, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. सरोज अहिरे, सत्यजित तांबे यांचा उल्लेखनीय सहभाग असेल. परिषदेत मार्गदर्शक म्हणून सहकार आयुक्त अनिल कवडे असतील. परिषदेचे अध्यक्ष म्हणून दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा असतील. तसेच सहकार भारतीच्या अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, नॅफकबचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, एनसीयूआयचे अध्यक्ष दिलीप संघानी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांचाही विशेष सहभाग असणार आहे. परिषदेच्या स्वागताध्यक्षा आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आदिवासी विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आहेत. तर खासदार हेमंत गोडसे तसेच दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर निमंत्रक म्हणून आहेत.
दोन दिवसीय परिषदेत सहकार बँकिंग क्षेत्रातील आधुनिक बदल, डिजिटलायझेशन, तंत्रज्ञान, भविष्यातील आव्हाने यांची चर्चा होण्याबरोबरच सहकारातील भविष्याचे लक्ष काय यावर विचारमंथन होईल ते भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारे ठरेल.
हेही वाचा :
- कोल्हापूर : दोन चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू
- तैवानचा चीनला ठेंगा
- माझ्यासह आ. प्रणितींना भाजप प्रवेशाची ऑफर : सुशीलकुमार शिंदे
The post मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये appeared first on पुढारी.