मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यात भाजपचे वातावरण कमी आहे. त्यामुळे पाच टप्प्यात निवडणुका घेऊन मोदींना पाच-पाच वेळा राज्यात प्रचारासाठी आणले जात असल्याची टिका शरद पवार यांनी केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नेत्याला ऐकायला लोकांना आवडते. त्यामुळे ते येतात, शरद पवारांच्या पोटात दुखायचे कारणच काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यासाठी अत्यंत शेवटच्या दिवस उजाडावा लागला याबाबत बोलताना फडणवीस यांनी उमेदवार जाहीर तर केला आहे. आमचे मित्रपक्ष शिवसेनेला जागा सुटली आहे. उमेदवार निवडूण आणण्यासाठी आमचे मित्रपक्ष काम करतील तसेच तीनही पक्षांची तयारी ही आधीपासूनच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कांद्याच्या प्रश्नावरुन शेतकरी वर्ग नाराज आहे. भाजपच्या उमेदवाराला प्रश्न विचारले जात आहे याबाबत बोलताना निर्यातीमध्ये शिथीलता येत आहे. अद्यापही शेतकऱ्यांंना खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण केल्या जात असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले आहे.

हेही वाचा –