नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सोमवारीसुध्दा बहुतांश भागांत दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले. पावसामुळे राज्यात गत तीन दिवसांत कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाल्याने राज्याचा सरासरी पारा 35 अंशांपर्यंत खाली आला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या 16 मे पर्यंत राज्यात सर्वत्र ‘यलो अलर्ट’चा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वार्यांची द्रोणीय रेषा कर्नाटक ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत जात आहे. ही रेषा मध्य महाराष्ट्रातून जात आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहत गारपीटही झाली. त्यामुळे सरासरी कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाली. गेल्या एक महिन्यांपासून कडक उन्हामुळे होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यात खान्देश पट्ट्यात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. परंतु गुरुवारपासून अचानक सुरु झालेल्या पावसाने घामाच्या धारातून नागरिकांची सुटका केली आहे. रविवारी (दि.१२) इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी तसेच नाशिक परिसरात पावसाने तासभर हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
असे आहेत ‘यलो अलर्ट’
– कोकण : 15 मेपर्यंत
– मध्य महाराष्ट्र : 16 मे
– मराठवाडा : 17 मे
– विदर्भ : 17 मे
- राज्याचे सोमवारचे कमाल तापमान
- अमरावती 41.8
- पुणे 31.4
- अहमदनगर 38.8
- जळगाव 40.5
- कोल्हापूर 33.7
- महाबळेश्वर 27.6
- मालेगाव 38.8
- नाशिक 34.1
- सांगली 34.9
- सातारा 33.4
- सोलापूर 37.4
- छत्रपती संभाजीनगर 35.6
- धाराशिव 38.2
- परभणी 38.1
- नांदेड 39.2
- बीड 38.2
- अकोला 40.1
- अमरावती 41.8
- बुलडाणा 34
- चंद्रपूर 40
- गोंदिया 38.8
- नागपूर 38.2
- वाशिम 41.6
- वर्धा 40
- यवतमाळ 40.5
हेही वाचा: